logo

देशिंग येथे संत निरंकारी सत्संग भवनचे उद्घाटन उत्साहात संपन्न संत निरंकारी मंडळ शाखा देशिंग येथे नव्याने बांधण्यात आल

देशिंग येथे संत निरंकारी सत्संग भवनचे उद्घाटन उत्साहात संपन्न

संत निरंकारी मंडळ शाखा देशिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सत्संग भवन इमारतीचे उद्घाटन निरंकारी मंडळाचे आदरणीय सुखदेव सिंहजी मेंबर इंचार्ज & जनरल सेक्रेटरी स.नि. म.दिल्ली यांचे शुभहस्ते संपन्न झाले यावेळी आयोजित विशाल सत्संग सोहळ्यामध्ये महात्मा म्हणाले की सत्संग भवनाची आपण सर्वांनी कदर केली पाहिजे सत्संग भवन मध्येच मानवाला खऱ्या मानवतेची शिकवण दिली जाते कारण सत्संग चा महिमा अपरंपार आहे सत्संगमुळे आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते सदगुरु ने आपल्याला पुर्ण परमात्म्याशी जोडलेले आहे सदगुरु सगळ्यावर प्रेम करतात ते ह्रदयापासुन करतात आपणास नेहमी सत्संग घडावी निरंकार परमात्म्याच्या एकत्र येऊन गुणानवाद करता यावा म्हणुन सत्संग भवनची निर्मिती केली आहे तरी सर्वानी नियमित सत्संग केली पाहिजे समयाच्या सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज ह्या ब्रह्मज्ञान द्वारे जगामध्ये विश्वबंधुत्व निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहेत त्याची शिकवण आपल्या जीवनामध्ये धारण करून आपण आपले जिवन सुखमय करावे आदी विचार मांडले.
यावेळी कोल्हापूर झोनचे झोनल इंचार्ज अमरलाल निरंकारी यांनी नवीन भवन इमारत झाले बद्दल देशिंग येथील भक्तांना शुभेच्छा दिल्या यावेळी सेवादल विभागाचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथ निकाळजे, रमेशलाल वाधवाणी कोल्हापूर,व सांगली जिल्हातुन मोठ्या संख्येने संत भाविक भक्त उपस्थित होते यावेळी देशिंग गावातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन प्राध्यापक सुरेश पोळ यांनी केले आभार सांगली संयोजक जालिंदर जाधव यांनी मानले सत्कार व कार्यक्रमाचे नियोजन देशिंग शाखेच्या मुखी अलका सुतार भगिनी यांचे मार्गदर्शन खाली सेक्टर मधिल सर्व सेवादल व संत महापुरुष यांनी केले.
-------------------------------------

301
14719 views
  
1 shares