logo

समर्पित भक्तीभावाने युक्त जीवन एक उत्सव बनून जाते - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज दिल्ली, 16 जानेवारी, 2

समर्पित भक्तीभावाने युक्त जीवन एक उत्सव बनून जाते
- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

दिल्ली, 16 जानेवारी, 2023: ‘सदोदित समर्पितपणे भक्तीभावाने युक्त होऊन जगलेले जीवन हे एक उत्सव बनून जाते असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती पर्व समागम’ मध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. दिल्ली, एनसीआर व आजुबाजुच्या निरंकारी भक्तगणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. भक्ती पर्व समागमामध्ये मुख्यत्वे करुन परम संत संतोख सिंहजी व अन्य भक्तांनी मिशनसाठी केलेल्या तप-त्यागपूर्ण जीवनाचे स्मरण केले जाते. हा कार्यक्रम देश-विदेशामध्ये आयोजित करण्यात आला.
भक्तीची परिभाषा समजावताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की सहज-सुंदर जीवन जगून आनंदाची अवस्था प्राप्त करणे हीच यथार्थ भक्ती होय. यामध्ये चतुराई किंवा चलाखीला कोणतेही स्थान नाही. पूर्णपणे समर्पित होणे हीच भक्तीची पराकाष्टा होय. संत-महात्म्यांच्या वाणीतून आपल्याला हीच शिकवण मिळत आली आहे, की आपण इतरांना प्राथमिकता द्यायची आहे; परंतु आपण तसे करत नाही. आपण अनिष्ट प्रथा आणि अवडंबरामध्ये इतके बांधले जातो, की भ्रमाशिवाय आमच्या हाती काही उरत नाही. जेव्हा आपण या निराकार प्रभूशी जोडले जातो तेव्हाच आपल्या मनातील समस्त भ्रम संपूर्ण जातात.

सद्गुरु माताजींनी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या शिकवणूकीचे उदाहरण देऊन सांगितले, की ज्याप्रमाणे घर तयार होण्याआधी त्याचा नकाशा तयार होतो. त्यानंतर त्यावर घर बांधले जाते. घर बांधल्याशिवाय त्याचा आनंद मिळू शकत नाही. अगदी अशाच प्रकारे भक्तीचा आधार सेवा, स्मरण आणि सत्संग आहे. यामध्ये आपण सर्वांशी गोड बोलून सर्वांप्रति परोपकाराची भावना बाळगायची आहे. अशी भावना मनापासून हवी, केवळ दिखावा असता कामा नये.
भक्ती हा प्रत्येकाचा स्वत:चा प्रवास असून या प्रभूशी एकरूप होण्याचा एक सरळ मार्ग आहे. अशा भक्तीनेच जीवन सार्थक बनते आणि भौतिक दिखावटीपासून आपण मुक्त होतो. भक्तीभावनेने ओतप्रोत जीवन जगणारा संत साध्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो. भौतिक जगाची चमक-दमक त्याच्यावर प्रभाव पाडू शकत नाही. इतरांचे दु:ख समजून घेऊन तो त्यांच्या प्रति आपुलकीचा भाव बाळगतो. त्याचे जीवन वाहत्या नदीसारखे निर्मळ असते.
मायाच्या प्रभावाविषयी समजावताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की ज्याप्रमाणे निराकार प्रभूने निर्मिलेल्या या सृष्टीमध्ये अनेक भिन्नता असूनही सर्वांमध्ये निराकार ईश्वराचा सारखाच वास आहे तद्वत जी जी वस्तू मायेच्या रूपात आहे ती क्षणभंगूर आहे. म्हणूनच क्षणभंगूर मायेशी संलग्न न होता या स्थिर अशा परमात्म्याशी नाते जोडावे. संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन आपली भक्ती सदृढ करावी.
भक्तिपर्व समागमाच्या प्रसंगी सद्गुरु माताजींच्या प्रवचनापूर्वी निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की भक्ताचे जीवन तेव्हाच भक्तीरूप होते जेव्हा त्याच्या आचरणात व व्यवहारामध्ये प्रेमरूपी सुगंध दरवळू लागतो. आपण स्वत:ला सद्गुरु माताजींच्या प्रति समर्पित करुन आनंद व उत्सवपूर्ण जीवन जगावे. आपल्या कर्मांच्या प्रभावाने इतरांसाठी प्रेरणास्रोत बनावे. गुरुवचनांना सत्य वचन मानून जीवन जगणे हीच खरी भक्ती होय. क्षणोक्षणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे हेच खऱ्या भक्ताचे लक्षण होय.
भक्ती हे कोणत्याही दिखाव्याचे किंवा अवडंबराचे नाव नाही ज्यामुळे लोक भयभीत होतील. भक्ती म्हणजे या साकाराकडून निराकाराची प्राप्ती करणे आणि त्याच्याशी एकरूप होण्याची अवस्था आहे. राजपिताजींनी उदाहरण दिले, की ऑर्केस्टामध्ये ध्वनी निर्देशन करण्यासाठी एक निर्देशक असतो. तो वादकांना निर्देश देत असतो. परिणामी एक सुंदर ध्वनी श्रवण करायला मिळतो. परंतु यातील एका जरी वादकाने स्वत:च्या मनमर्जीने कार्य केले तर तो संपूर्ण ध्वनी बदलून जाईल. तात्पर्य, जेव्हा आपण जीवनात लालसा, मोह, स्वार्थ यांसारख्या भ्रमांमध्ये अडकतो तेव्हा जीवनातील आनंदरूपी मधुरता संपून जाते. जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. तोच खरा मार्गदर्शक व प्रेरणास्रोत असतो जो आपल्या सकारात्मक प्रभावाने आपल्याला मौल्यवान बनवतो. त्यामुळे गुरुविना भक्ती शक्य नाही. अशी अवस्थाच भक्तीमय असते आणि आपल्या जीवनाचा आधारदेखील बनते.
शेवटी, सद्गुरु माताजींनी समस्त भक्तगणांना भक्तीमार्गावर अग्रेसर होण्याची प्रेरणा दिली आणि पुरातन संतांच्या भक्तीभावनेतून प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थक करण्याचे आवाहन केले.

18
14717 views
  
1 shares