logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....

तेरणासाठी आप बाभळगावच्या वेशीवर पोलीसानी आंदोलनकर्त्यास घेतले ताब्यात

लातूर दि.२२ (प्रतिनिधी) -
माजी मंत्री आ. अमित देशमुख आरोग्यमंत्री डाँ तानाजी सावंत यांच्या न्यायालयीन कुरघोडी मध्ये तेरणा सहकारी साखर कारखाना अडकलाय. या कुरघोडीमुळे सभासदाचे भविष्य पुन्हा अंधार मय झाले आहे.तेरणा कारखाना पुन्हा चालु करावा न्यायालयीन प्रक्रिया मध्ये हा कारखाना अडकाऊ नका.या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अजित खोत यांच्या नेतृत्वात आज बाभळगाव येथील आ.अमित देशमुख यांच्या घरा समोर आंदोलन होते हे आंदोलन करण्या पुर्वीच बाभळगावच्या वेशीवर पोलीसांनी आंदोलनकर्त्या आडवले.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षापासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. मात्र या टेंडर प्रक्रियेवरून भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर यांच्यामध्ये म्हणजेच आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत व माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या २ संस्थेमध्ये वाद निर्माण झाला आहे. न्यायालयात प्रलंबित असून या बाबत ट्वेंटीवन शुगरचे आ. देशमुख व भैरवनाथ शुगरचे मंत्री डॉ सावंत यांनी न्यायालयाबाहेर आपसात तडजोड करावी व हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा. तसेच न्यायालयीन कुरघुड्या बंद करा व तेरणा सुरु करा या एकमेव मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने आ. देशमुख यांच्या लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील गढीसमोर दि.२२ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य ऍड. अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आंदोलकांना बाबळगाव फाट्यावरच पोलिसांनी अडवुन त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली. तर प्रशासनाच्या माध्यमातून हे आंदोलन चिरडून काढले. दरम्यान, आम्हाला याबाबत आश्वासन दिल्याशिवाय पोलिस ठाण्यातून जाणारच नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यानी घेतली असता ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष यांनी पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

यावेळी बोलताना ऍड. खोत म्हणाले की, तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची भैरवनाथ शुगरची निविदा जिल्हा सहकारी बँकेने मंजूर केली. या विरोधात ट्वेंटीवन शुगरने डीआरटी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ट्वेंटीवन शुगरच्या विरोधात निकाल दिला. त्या निकालाच्या विरोधात ट्वेंटीवनने DRAT न्यायालयात अपील केले. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून शेतकरी, कारखान्याचे सभासद, व्यापारी व त्यावर अवलंबित्व असलेल्यांच्या हितासाठी हा कारखाना सुरू होणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे. मात्र देशमुख व सावंत यांच्या न्यायालयीन लढ्यामुळे हा कारखाना सुरू होत नाही. त्यामुळे कारखान्याचे ३५ हजार सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून या भागातील शेतकरी ऊस लावण्यापासून वंचित राहू लागले आहेत. हा प्रश्न या दोघांनी तात्काळ न सोडविल्यास आम्ही सर्व सभासदांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन दाद मागणार असल्याचे खोत यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, युवक जिल्हाध्यक्ष आकाश कावळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, लातूरचे जिल्हाप्रमुख प्रताप भोसले, लातूर जिल्हाध्यक्ष सचिन औरंगे, लातूर जिल्हा सचिव कुमार खोत, लातूर शहर युवा अध्यक्ष माने, लातूर ग्रामीण अध्यक्ष सतीश कारंडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

आम्ही आ. देशमुख यांच्या बाबळगाव येथील गढीसमोर लोकशाही मार्गाने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी न करता हे आंदोलन शांततेत करणार होतो. मात्र देशमुख यांनी आमचे आंदोलन कशामुळे चिरडले ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी न्याय मिळेपर्यंत आम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

0
0 views