logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....

नागरी संरक्षण युवा आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्राथमिक प्रशिक्षण पाठ्यक्रम १७/२०२२
१७ मे ते २१ में २०२२

महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल ठाणे
(गॄह विभाग विषेश) अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ६५ युवक युवतींना "आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्राथमिक प्रशिक्षण" शिबीराचे समारोप प्रसंगी प्रमुख अतिथीचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.मा. विजय जाधव‌ साहेब उपनियंत्रक
नागरी संरक्षण दल ठाणे (महाराष्ट्र शासन) , डाॅ. महेश भिवंडीकर सर चेअरमन-अचिव्हर्स कॉलेज आॉफ कॉमर्स व मॅनेजमेंट , श्रीमती दिपा दौलत घरत मॅडम सहा. उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे , सोफिया डिसोझा मॅडम प्राचार्या-अचिव्हर्स कॉलेज कल्याण , सना खान मॅडम उपप्राचार्या-अचिव्हर्स कॉलेज कल्याण , १) सहाय्यक उप नियंञक श्रीमती.दिपा घरत यांनी नियोजित वेळापञकाप्रमाणे पांचव्या व अंतिम दिवसाचे व्याख्यान व प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करुन सर्वांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा श्रीम.शकुंतला राॅय व श्री अजित कारभारी यांच्या मदतीने घेतली.
ठाणे जिल्ह्यात युवक युवतींचे "शिघ्र प्रतिसाद पथक" QRT तयार करुन आपत्कालीन परिस्थितीत जिवीत व वित्त रक्षणार्थ कार्य करण्यात येणार आहे" असे श्री. विजय जाधव‌, उपनियंत्रक, नागरी संरक्षण नवी मुंबई समुह, ठाणे यांनी मौलिक व उद्बोधक मार्गदर्शन करुन सर्व स्वयंसेवकांना सामाजिक बांधिलकीची "शपथ" दिली.
श्री.भिवंडीकर सर यांनी नागरी संरक्षण दलाचे ७-८ कोर्सेस "ए" ग्रेड मध्ये केले असल्याचे अनुभव कथन केले. प्रशिक्षण शिबीराचे समारोप कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन श्री.अजित कारभारी
(राज्य युवा पुरस्कारार्थी - महाराष्ट्र शासन) नासद स्वयंसेवक यांनी केले.

118
13157 views
  
1 shares