logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....

एक दिवसीय पुर विमोचन प्रशिक्षण ,

कल्याण - महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल ठाणे व उल्हासनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे रोजी पुर विमोचन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन रायता नदी, कल्याण ग्रामीण येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी उल्हासनगर महापालिका उपायुक्त डाॅ. सुभाष जाधवजी,उपायुक्त मुख्यालय श्री अशोक नाईकवडेजी, उप नियंत्रक नागरी संरक्षण ठाणे माननीय विजय जाधव साहेब, सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे श्री अतुल जगताप
, मा. बाबासाहेब नेटके (मुख्य अग्निशमन अधिकारी, उल्हासनगर महानगरपालिका ), श्री. अजित कारभारी (सुवर्ण पदक, राष्ट्रीय ऑल इंडिया वाॅटरमन बॅंगलोर) तसेच उल्हासनगर महापालिकेचे ६० सुरक्षा रक्षक, कर्मचारी, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे ६० स्वयंसेवक हजर होते.
प्रशिक्षण शिबीराचे दरम्यान लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे, प्रथमोपचार,कृत्रीम श्वसन पद्धतीचा वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली.

11
1533 views