logo
logo
(Trust Registration No. 393)
aima profilepic
SUNIL VISHNU KASAR
Maharashtra reporter

नाशिक :- राज्यात दिवसेंदिवस अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. नाशिकमधील वणी येथे एका महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा मित्र बसस्थानक परिसरात बसले होते. तेव्हा या परिसरात असलेल्या संशयितांनी त्यांना येऊन धमकी दिली आणि पीडितेवर बुधवारी रात्री अकरा वाजता सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील चारही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकसारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आरोपी धमकी देता, त्यानंतर सामूहिक अत्याचार करतात. बसस्थानक परिसरात अशा घटना घडतात. आरोपींच्या मनात पोलिसांविषयी भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना घडत आहेत, असे मत आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

..........
0
16 views    0 comment
0 Shares

पुण्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येमुळे सध्या खळबळ माजली आहे.

बिबवेवाडी परिसरात कबड्डी खेळत असताना कोयत्याने वार करुन तिची हत्या करण्यात आली.

या धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीची केस कोणी लढू नये असं सांगत आक्रोश व्यक्त केला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान मुलीवर आरोपीने ४४ वेळा वार केल्याची माहिती मुलीच्या मामाने दिली आहे.“तीन महिन्यापूर्वी आरोपीने मुलीला त्रास दिला होता.

तेव्हा मी त्याला समज दिल्यानंतर तो शांत झाला होता. मात्र काल त्याने तिच्यावर वार करून खून केला. आरोपीला अडवण्याचा प्रयत्न तेथील मुलींनी केला. मात्र तो वार करीत राहीला.

त्याने तिच्यावर ४४ वार केले आहेत. या आरोपीची केस कोणीही लढू नये आणि फास्ट ट्रॅक कोर्टातून लवकरात लवकर न्याय मिळावा,” अशी मागणी मयत मुलीचे मामा अमोल शिंदे यांनी केली आहे.“काल सायंकाळच्या सुमारास मयत मुलगी कबड्डीचा सरावासाठी यश लॉन्स येथील परिसरात गेली होती.

तेव्हा मुख्य आरोपीसह चौघे जण दुचाकीवरून तिथे गेले. मुलीस बाजूला घेऊन तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वार केले. या घटनेत तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासात मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपी मयत मुलीच्या घराशेजारी पाच वर्ष राहत होता. मात्र साधारण वर्षभरापूर्वी दुसरीकडे राहण्यास गेला होता. आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे,” अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.“पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.“यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांनी दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना पुढे म्हटलं की, “अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत”.

..........
59
1302 views    0 comment
23 Shares

नांदूरघाट(ता.केज): दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला. काेरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे शिक्षिका विरहात होती. माय-लेकीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. दरम्यान, मातृप्रेम किती घट्ट असते याचा प्रत्यय बाणेगावच्या (ता.केज) ग्रामस्थांना १६ रोजी आला. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता... हे चित्र पाहून उपस्थितांना गहिवरुन आले. आशा सुंदर जाधवर (२२) व शांभवी सुंदर जाधवर (१८ महिने) अशी त्या माय-लेकीची नावे आहेत.आशा यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा.वडजी ता.वाशी जि.उस्मानबााद) यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वी सुंदर यांना कोरोनाची लागण झाली, यातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या. १६ सप्टेंबर रोजी वडील बाहेरगावी गेले होते तर आई शेतीकामात व्यस्त होती. दुपारी ४ वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या. यावेळी खेळता - खेळता मुलगी विहिरीजवळ गेली. तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींचाही बुडुून मृत्यू झाला.आशा व शांभावी या मायलेकी गायब झाल्याने शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी सहा वाजता विहिरीच्या काठावर आशा यांची चप्पल आढळली. त्यामुळे त्या दोघी विहिरीत पडल्याची शक्यता गृहित धरुन तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युतपंपांद्वारे पाणी उपसा सुरु झाला. रात्री साडेअकरा वाजता पाणी उपसा केल्यावर माय-लेकीचे मृतदेह आढळून आले. यावेळी आशा यांच्या कडेवर मुलगी शांभवी होती तर शांभवीचा हात आईच्या हातात होता.केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे, जमादार जसवंत शेप, रशीद शेख यांनी धाव घेतली. १६ रोजी रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. १७ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी ११ वाजता मायलेकीवर एकाच चितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत. नातेवाईकांचे जवाब बाकी असून अधिक तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले.

..........
57
2605 views    0 comment
42 Shares

43
2372 views    0 comment
21 Shares

रक्षाबंधनच्या दिवशी बांगड्या विकणाऱ्या एका मुस्लीम विक्रेत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

इंदुरच्या बाणगंगा ठाणे क्षेत्रात गोविंद नगर येथील परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात असून यात बांगडी विक्रेत्याला काही लोक जबर मारहाण करत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. त्यासोबतच त्याच्या बॅगमधून बांगड्या काढून घेण्यात येत असल्याचंही दिसून येत आहे.

स्थानिकांनी या बांगडी विक्रेत्याला मारहाण नेमकी का केली यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत गुन्ह्याची नोंद केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तीन युवक या बांगडी विक्रेत्याला जबर मारहाण करताना दिसत आहेत.

त्यातील एक जण बांगडी विक्रेत्याच्या बॅगमधून सर्व बांगड्या बाहेर काढून टाकत आहे. तर बांगडी विक्रेता हात जोडून वारंवार माफी मागताना दिसत आहे.

मारहाण करणारे युवक या परिसरात पुन्हा दिसायचं नाही अशी धमकी बांगडी विक्रेत्याला देत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाणगंगा पोलीस ठाण्याचे अधिक्षक राजेंद्र सोनी यांनी याची दखल घेतली.

व्हायरल झालेला व्हिडिओ बाणगंगा क्षेत्रातील गोविंद नगर परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. पण या व्हिडिओ संदर्भात अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असंही राजेंद्र सोनी म्हणाले. 

..........
14
1585 views    0 comment
0 Shares

सतारा। भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीहून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली त्यानंतर त्यांनी आपली कोविड टेस्ट.केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. उदयनराजे भोसले यांची प्रकृती स्थिर आहे.चार दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. उदयनराजे भोसले यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासदार उदयनराजे हे चार दिवसांपूर्वी दिल्लीहून थेट रुग्णालयात दाखल झाले. दिल्लीहून आल्यावर उदयनराजे भोसले यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपली कोविड चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

..........
13
1551 views    0 comment
7 Shares

सिडनी: ऑस्ट्रेलियात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून चार प्रमुख शहरांमधील लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये कोरोना विषाणूनं सर्वाधिक हाहाकार उडवून दिल्याचं चित्र आहे. सिडनीतल्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.सिडनीमध्ये गेल्या 7 आठवड्यांपासून लॉकडाऊन लावण्यात आला असून सोमवारपासून सुरू झालेला आठवा आठवडाही लॉकडाऊनचाच असणार, हे निश्चित झालं आहे.

1.5 ट्रिलियन डॉलरच्या ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेसमोर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मोठं आव्हान निर्माण केलं आहे.ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये मृत्यूंचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचं चित्र असून गेल्या 24 तासात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिन्यातील एका दिवसांत नोंदवलेला गेलेला हा सर्वोच्च आकडा असल्याचं ऑस्ट्रेलियन प्रशासनानं सांगितलं आहे.


सिडनीमध्ये एका 15 वर्षांच्या मुलाचाही कोरोनानं बळी घेतला आहे. 11 जुलैपासून आतापर्यंत सिडनीमध्ये एकूण 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे गेलेल्या एकूण बळींची संख्या 966 वर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा आणि डार्विन या चारही प्रमुख शहरात कडक निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.मृत्युची आकडेवारी वाढत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारनं सैन्याला रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. सिडनीत वेगवेगळ्या भागात 200 सैनिक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले असून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर ते बारीक लक्ष ठेऊन आहेत. कुठेही गर्दी होऊ नये आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी सैन्याला रस्त्यावर उतरवत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियन प्रशासनानं माध्यमांना दिली आहे.

..........
13
1336 views    0 comment
4 Shares

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात येत्या १३ ऑगस्टपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी‌ काढले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने पुर्णत: बंद ठेवावीत अशी सूचना करण्यात आली आहे.

नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील माढा माळशिरस करमाळा सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांतील गावांत कडक निर्बंध राहणार आहेत.साेलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

या तालुक्यांत काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाउन अंतर्गत कडक निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले आहेत.त्यानूसार पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये येत्या १३ ऑगस्ट पासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवावीत, अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू ठेवावीत, मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना पूर्णत: बंदी, विवाह सोहळ्यास ५० ऐवजी २५ लोकांची उपस्थिती हवी, खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यातच आता संचार बंदीचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

..........
0
1336 views    0 comment
0 Shares

टोक्यो। टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे.

नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला.

नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.'नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू.

तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,' अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे.नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावल्यानंतर त्याच्या वडिलांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि माझ्या मुलाने हे स्वप्न पूर्ण केल्यामुळे मी आनंदी आहे. त्याने ज्या प्रकारे मेहनत केली ते बघता त्याला गोल्ड मेडल मिळेल, याचा विश्वास होता, असं नीरजचे वडील म्हणाले. नीरजने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

..........
10
399 views    0 comment
0 Shares

टोक्यो ।  टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे.

भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला.

नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.'नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,' अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे.नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावल्यानंतर त्याच्या वडिलांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि माझ्या मुलाने हे स्वप्न पूर्ण केल्यामुळे मी आनंदी आहे. त्याने ज्या प्रकारे मेहनत केली ते बघता त्याला गोल्ड मेडल मिळेल, याचा विश्वास होता, असं नीरजचे वडील म्हणाले. नीरजने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

..........
46
3242 views    0 comment
3 Shares

नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

आरोपींनी चिकनच्या दुकानातील कोयत्यानं दोघांवर भररस्त्यात सपासप वार केले आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ  सोशल मीडियात वेगान व्हायरल होतं आहे.विशेष म्हणजे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाई करण्यात विलंब लावला आहे.

त्यामुळे परिसरातील दुकानदारांकडून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. अमीर खान आणि मझर खान असं हल्ला झालेल्या दोघां भावांची नावं असून दोघांनाही स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

..........
109
4504 views    0 comment
6 Shares

अमरावती शहरातून हवालामार्फत मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज मंगळवारी पहाटे केलेल्या कारवाईत दोन स्कॉर्पियोमधून सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.हवालामार्फत शहरातून मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील फरशी स्टॉप परिसरात नाकाबंदी केली होती. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून ही सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक पोलीस तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमधून या मोठ्या रकमेची वाहतूक करणारे सहा नागरिक हे गुजराती येथील निवासी असल्याचे समजते. पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओमध्ये पैसे ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यासाठी दोन्ही स्कॉर्पिओ गाड्यांच्या मधल्या सीटच्या खाली एक खचका तयार करण्यात आला होता. लोखंडाच्या जाड पत्रा व नट बोल्ट याचा उपयोग करून ही जागा तयार करण्यात आली होती. वरवर पाहता कुणालाही शंका येणार नाही अशी व्यवस्था या दोन्ही स्कॉर्पिओमध्ये करण्यात आली होती.दरम्यान, ही रक्कम मोजण्यासाठी तीन स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्रेझरी व इन्कम टॅक्स विभागाला माहिती देण्यात आली आहे पोलीस आयुक्त आरती सिंह व डीसीपी सातव यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. ठाणेदार मनीष ठाकरे या संपूर्ण तपासाची चौकशी करीत आहेत.

..........
164
4801 views    0 comment
68 Shares

देशात 5 वर्षांपासून पॉर्न साइट्सवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक लोक गुपचूप कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं पॉर्न पाहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच 2020मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार भारतातील सर्वात जास्त पॉर्नसाइट्स या महाराष्ट्रात आणि त्यातही राज्यातील 3 जिल्हात पाहिल्या जातात. साधरण 850 पॉर्न साइट्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झालं नाही.

महाराष्ट्रात सर्वात जास्त पॉर्न साइट पाहणाऱ्यांची संख्या असल्याचं एका सर्व्हेमधून समोर आलं. गुगल पॉर्न सर्चिंगमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा जास्त समावेश आहे. त्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पुणे आणि नाशिक किंवा नागपूरचा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर जे शहर आहे त्याचं नाव ऐकून अनेकांचे डोळे विस्फारतील. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा पॉर्न साइट पाहण्यात पहिला क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक आणि तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे. अश्ली_ल फिल्म पाहणे आणि पॉर्न साइट्सना भेट देणार्‍यांची संख्या जवळजवळ चौपट वेगाने वाढलेली दिसते. या पाहणाऱ्यांमध्ये आणि वापरकर्त्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन मुले आणि मुली, महिला आणि वृद्ध अशा सगळ्यांचा समावेश आहे. राज्याच्या उपराजधानीत पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. आता सायबर पोलिसांनी या नव्या ट्रेंडवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर पॉर्न शोधण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या  कलम 149अन्वये आयटी कायद्याच्या कलम (67 (ए, बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. त्यामुळे पॉर्न पाहणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

..........
45
3296 views    0 comment
27 Shares

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा सध्या  मोठ्या अडचणीत सापडला आहे. अश्लिल फिल्म शूट केल्याप्रकरणी आणि इंटरनेटवर पोस्ट केल्याप्रकरणी त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राचं पॉर्न कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. या पोर्न फिल्म निर्मितीचा आणि प्रदर्शनाचा 2021 साली फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश झाला होता. पण आता सर्व रहस्य समोर आलं आहे. अभिनय क्षेत्रात नाव मोठं करण्यासाठी आलेल्या  अभिनेत्रींना चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना अश्लील चित्रपटात करण्यास भाग पाडायचे आणि नंतर हे चित्रपट Porn apps च्या माध्यमातून इंटरनेटवर अपलोड करायचे. त्यानंतर हे व्हिडिओ फक्त देशातचं नाही तर परदेशात देखील वितरित करायचे.हा सर्व प्रकार सुरू असताना एका खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एपीआय लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती. त्यामधील एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता.  

..........
25
2189 views    0 comment
11 Shares

सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील मालन बबन गायकवाड या महिलेचा राहत्या घरात खून झाल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक निरीक्षक डॉक्टर सागर वाघ यांनी तपासाला सुरुवात केली. 

त्यामध्ये बायको दारू प्यायची म्हणून कंटाळलेल्या नवऱ्याने लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत मालन यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.नागठाणे येथील झाल्या प्रकाराची माहिती सहायक निरीक्षक वाघ यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील सहाय्यक पोलिस अधिक्षक अंचल दलाल यांना कळवली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नागठाणे येथे महिला फौजदार वर्षा डाळींबकर आणि राकेश देवकर, धनंजय जाधव, राजू शिखरे, विशाल जाधव, प्रकाश वाघ, अमित पवार, शीतल शिंदे यांच्या पथकासह जाऊन पाहणी केली.या चौकशीदरम्यान मयत मालन आणि तिचा नवरा बबन बाबुराव गायकवाड यांच्यात दारू पिल्यानंतर सतत भांडणे होत असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून बबन गायकवाड याच्याकडे पोलिसांनी तपास केला, तेव्हा मालन हिला दारूचे व्यसन असल्याने या कारणावरून आमच्यात भांडणे होत होती. या भांडणातच रात्री ती दारू पिल्याने जोरात भांडण झाले. त्यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. अशी कबुली पोलिसांना दिली.दरम्यान घरामध्ये तपास केल्यानंतर पोलिसांना दारूच्या 300 बाटल्या आढळून आल्या. या बाटल्या गावातीलच एका व्यक्तीने आणून ठेवल्याची माहिती बबन गायकवाड याने दिली. त्यावरून अविनाश साळुंखे या व्यक्ती विरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास बोरगाव पोलिस करत आहेत

..........
61
2334 views    0 comment
35 Shares

अहमदनगर । पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आल्यानंतर शेवटी थकून गेल्यामुळे एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहमदनगर शहरातील धबधब्यावर हा दुर्दैवी प्रकार घडला. मयूर परदेशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघांना जिवदान देणाऱ्या या तरुणाचा दम लागून शेवटी मृत्यू झाल्यामुळे अहमदनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील काही युवक धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते। यावेळी हे तिघेही पाण्यात पोहत होते।

मात्र, पोहत असताना या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. हे तिघेही धबधब्यात बुडत होते। हा सर्व प्रकार यावेळी मयूर परदेशी या तरुणाने पाहिला. कशाचाही विचार न करता त्याने धबधब्यात उडी घेतली आणी एकएक करुन तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढले।

मात्र, पाण्याच्या प्रवाहातून तिघांनाही बाहेर काढत असताना मयूर परदेशी थकला. शरीरातील त्राण गेल्यामुळे शेवटी धबधब्याच्या काठावर येईपर्यंत परदेशी याला धाप लागली. यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.तिघांना वाचवणारा हा तरुण बुडत असताना त्याला सर्वजण पाहत होते. तरुणाला बुडताना पाहून इतरांनी आरडाओरड केली. त्यानंतर काही युवाकांनी मदतीसाठी धबधब्यात उडीदेखील घेतली. मात्र तोपर्यंत परदेशी पाण्यात बुडाला होता. त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

..........
0
445 views    0 comment
0 Shares

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अश्लिल चित्रपट बनवणं आणि प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने हि कारवाई केली आहे. राज कुंद्रा यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून कुंद्रा यांनीच कारस्थान रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. 

आज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली. उद्या कुंद्रा यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

..........
44
1263 views    0 comment
20 Shares

जाफराबाद। तालुक्यातील टेंभुर्णी-देऊळगाव राजा महामार्गावरील आकाश पेट्रोल पंपासमोर काल रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा स्कोर्पिओ कार चालकाचा ताबा सुटल्याने विचित्र अपघात घडला. या अपघातात स्कोर्पिओ कार अक्षरशः चित्रपटातील दृष्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या पाच फूट उंच बोनट वर जाऊन अडकल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात चालकांसह एक जण किरकोळ जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.महिंद्रा स्कोर्पिओ कार देऊळगाव राजा येथून टेंभुर्णीकडे भरधाव वेगाने घेऊन येत असताना अचानक स्टेरींग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटला।

यावेळी हि कार पेट्रोल पंपाची सुरक्षा भिंत तोडून विदूत खांबावर चढली. मात्र गाडीचा वेग इतका जास्त होता कि, विदूत खांबावर चढलेली ही गाडी विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या बोनट वर जाऊन आदळली!कारचा वेग जास्त असल्याने चित्रपटाच्या दृष्याप्रमाणे ही कार ट्रॅक्टर च्या बोनट वर चढल्याने आश्चर्य चकित करणारा हा अपघात पाहून सगळ्यांचे डोळे अक्षरश चक्राऊन गेले।

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, चालकासह एक जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचरासाठी टेंभुर्णी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात पेट्रोल पंपांच्या सुरक्षा भिंतीचे व विदूत पोल आणि ट्रॅक्टरसह महिंद्रा स्कोर्पिओ कारचे मोठे नुकसान झाले आहे।

..........
0
165 views    0 comment
1 Shares

लातूर : सत्तेचाळीस वर्षापासून संसारात साथ देणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे दु:ख सहन न झाल्याने अवघ्या काही वेळेतच पत्नीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा उस्तुरी येथे घडली आहे.

पती-पत्नीचा एकाच दिवशी झालेला मुत्यू आणि आई–वडीलांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी प्रसंग मुलांवर आलेला आला आहे.निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील सिद्रामप्पा व ललिता या ईटले दाम्पत्याने अवघी हयात शेती कसून कष्टाने आपला उदरनिर्वाह भागवला.

धार्मिक संस्कार असलेल्या या पती-पत्नीने संसाराचा गाडा ओढत असताना 47 वर्षात अनेक चढउताराच्या प्रसंगांना सामोरे जात गोडीगुलाबीने संसार थाटला. या दाम्पत्याला 4 मुले आहेत.यामध्ये मोठ्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत असल्याने मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी शेती विकून मुलाला शिकविण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेऊन मुलाला प्राध्यापक केले.

हाच मुलगा गावातुन सेट नेट उत्तीर्ण व पीएच.डी पुर्ण होणारा पहिला विद्यार्थी ठरला. याचबरोबर 6 जुन रोजी शेवटच्या मुलाचा लग्न करून देत या दाम्पत्याने पारिवारिक सर्व कर्तव्य पुर्ण केले.दरम्यान आज सकाळी 8 वाजता सिद्रामप्पा ईटले हे आंघोळ करून चहा घेत होते. त्याचदरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे कुटुंबियांनी डॉक्टरांना बोलावून आणले व तपासणी केली असता त्यांचा प्राण गेला होता. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच ललिताबाई ईटले यांनाही हृदयविकाराचा झटका आला व त्यांचाही जागीच मृत्यू झाला.पतीच्या निधनाची वार्ता गावात सर्वत्र पोहोचले असतानाच अवघ्या काही वेळातच पत्नीनेही प्राण सोडल्याची वार्ता गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी चौथ्या मुलाचे लग्न करून आनंदात असलेल्या या कुटुंबात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

..........
1
1553 views    0 comment
6 Shares

0
284 views    0 comment
1 Shares

भिवंडी। मौजमजा करण्यासाठी मित्राच्या   गळ्यातील सोन साखळी  हिसकावून घेत असताना विरोध केला म्हणून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची गळा दाबून खून केल्याची घटना भिवंडीमध्ये   घडली आहे. धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर मित्राचा मृतदेह सोफ्यात लपून ठेवला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम गजबे (वय 14)  असं मृतकअल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (24)  असं आरोपीचे नावे आहेत. मृतक सोहम हा कल्याण-पडघा मार्गावरील बापगाव येथील जय मल्हारनगरमधील एका इमारतीत कुटुंबासह राहत होता.बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपींनी मृतक सोहमला भेटण्याच्या बहाण्याने बोलवून त्याला तो राहत असलेल्या परिसरातील एका इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये घेऊन गेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत असतानाच मृतक सोहमने विरोध केला. त्यामुळे दोघा आरोपींनी त्याची गळा आळवून हत्या करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढली. आणि त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी एका सोफ्यात लपवून ठेवला. त्यांनतर दोघानांही  मृतकची सोनसाखळी कल्याणातील एका सोनाराकडे 10 हजार रुपयात गहाण ठेवून त्यामधून मिळालेल्या पैश्यातून मैजमजा केली.बुधवारी दुपारपासून सोहम बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबासह तो राहत असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सायंकाळपासून त्याचा कुटुंबाने शोध केला. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्यावर संशय येऊन नये म्हणून या आरोपींनीही त्याच्या कुटुंबासोबत फिरून त्याचा शोध घेत होते. अखेर रात्रीच्या सुमारास एका बंद फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोध घेतला असता, त्याचा मृतदेह सोफ्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यांनतर घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करून सोहमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळी नातेवाईकांने दिलेल्या माहिती व संशयातून सोहमच्या दोघमित्रांना ताब्यात घेतले आहे. सोहमच्या हत्येच्या 10 दिवसापूर्वीही आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी मधील लॉकेट विकून मौज मजा केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर केवळ मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मित्राची हत्या करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.

..........
96