ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना, नाशिक तर्फे 14 नोव्हेंबर बालदिन अनाथ आश्रम येथे साजरा करण्यात आला.
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री.प्रकाश डोंगळे व उपाध्यक्ष श्री.धर्मेंद्र आगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.कल्पेश विजय महाले महाराष्ट्र प्रदेश सहसचिव व श्री.रमेशगिरी गोसावी नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून "14 नोव्हेंबर बालदिन निमित्त बाल आधार आश्रम त्रंबकेश्वर येथे अनाथ मुलांना शाळेत वस्तू , तांदूळ , गव्हाचे पीठ , स्टील भांडे , बिस्कीट पुडे देऊन बालदिन साजरा करण्यात आला." यावेळी सौ.आशा उगले महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष, सौ.मीना पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष, सौ.नाझनिन तारवाला नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष, श्री.उमेश कासार नाशिक जिल्हा सरचिटणीस, सौ.रचना कासार नाशिक शहर महिला कार्याध्यक्ष, सौ.चेतना बिरामने नाशिक जिल्हा महिला सरचिटणीस सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.