logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे येथे कृषी परिषद बैठक संपन्न, कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे शेतकऱ्यांच्या अडचणी बाबत मार्गदर्शन

पुणे. महाराष्ट्र राज्य कृषि परिषदेची 105 बैठक मंत्री कृषी तथा अध्यक्ष कृषी परिषद दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सदर बैठकीसाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. विलास भाले, अशोक धवन, संजय सावंत व प्रशांत पाटील तसेच कृषि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने सदस्य कृष्णा लव्हेकर, संचालक डॉ.हरिहर कौसडीकर, गोखले,शिर्के, वित्तीय सल्लागार अस्मिता बाजी आणि परिषदेचे अधिकारी व इतर सदस्य उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने 2018 19 बॅचच्या पदविकाधारक विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश देण्याबाबत मान्यता देण्यात आली. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्ष इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम मांजरी फार्म पुणे परभणी व काष्टी ता. मालेगाव येथे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.


कृषी मंत्री दादा भुसे यांनी सद्यस्थितीत कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन होणे व त्यानुसार शिक्षण प्रणाली राबविण्याबाबत निर्देश दिले. यात हवामान बदलानुसार पीक पद्धती, मशागत तंत्रज्ञान नवीन वाणाची सुधारणा याविषयी संशोधन व विस्‍तार शिक्षण हाती घेण्याबाबत सूचना दिल्या. कृषी विद्यापीठातील उपलब्ध सर्व साधनसामग्री यांचा आढावा घेऊन त्यानुसार त्याचा वापर प्रभावीपणे करण्यावर जोर देण्याचे निश्चित केले. कृषी विद्यापीठांनी विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधकामासाठी सीएसआर सारखे इतर निधी उपलब्ध करून कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले कृषी अभ्यासक्रमात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे तसेच जटिल समस्यांचे संशोधनासाठी विषय सुचवणे याबाबत कुलगुरूंनी पुढाकार घ्यावा. कृषी विद्यापीठ व केंद्र शासनाच्या विविध पिकांच्या संशोधन केंद्राचे संशोधन कार्य प्रभावीपणे शेतकऱ्याची उपयोगी पडेल या दृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे गरजेचे आहे त्यासंदर्भात सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील डाळिंब पिकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गंभीर समस्यांसंदर्भात राहुरी कृषी विद्यापीठ यांनी भरीव कार्य करण्याची आवश्यकता कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी कृषी विद्यापीठे व कृषी महाविद्यालयांची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मानके करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न होणे बाबत आशा व्यक्त केली. कृषी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर यांनी कृषी विद्यापीठातील प्रलंबित विषयासंदर्भात परिषदेमार्फत पाठपुरावा करून गतिमान कामकाज करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेवटी विठ्ठल शिर्के यांनी आभार मानले.

169
19016 views
12 shares

Comment