logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चिपळूण येथील बहादुर शेख येथील वाक्यातील आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता

चिपळूण। आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखालील टेरव पंचायत समिती गटातील मुंढे गावचे सरपंच मयुर खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी बहादुरशेख येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व परिसरातील स्वच्छता करण्याचे काम पुर्ण करण्यात आले

     नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण परिसर पुर्णपणे जलमय झाला होता यामुळे बहादुरशेख येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ण आकृती पुतळ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते परंतु टेरव पंचायत समिती गटातील मुंढे सरपंच मयुरजी खेतले व राजु भाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील स्वच्छता करण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे । 


    आमदार शेखर निकम याचे चिरंजीव अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी मोजस कंपणीचे कर्मचारी यासह राजुभाई जाधव युवकचे नेते राम राजेशिर्के योगेश सुतार श्याम खेतले विराज कदम अक्षय गमरे रुपेश खेतले रोहित गमरे इत्यादी यावेळी सहभागी झाले होते।


122
28250 views

Comment