logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बीड जिल्ह्यात तरुणी,महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे.

बीड जिल्ह्यात तरुणी,महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत असताना अंबाजोगाई येथे एका महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपींनी पीडितेला बदनामीची धमकी देत तब्बल तीन लाख रुपये रोख आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने उकळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथे शिक्षणासाठी राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीची ओळख महेश करपे (रा. धारूर) व पवन कराड (रा. पांगरी, ता. परळी) या दोघांशी झाली होती. सुरुवातीला ओळखीचा फायदा घेत आरोपी तिचा पाठलाग करत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, महेश करपे याने एका प्रसंगी तरुणीला खाद्यपदार्थातून(मन्चुरिन) मधून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही तरुणीला पुण्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आरोपींनी संबंधित घटनेचे फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपींनी पीडितेकडून वेळोवेळी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतल्याचे समोर आले आहे.

दिर्घकाळ मानसिक त्रास सहन केल्यानंतर पीडित तरुणीने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
**********†**************

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
67 views

Comment