logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

परमाळे येथे भव्य आरोग्य मेळावा संपन्न; कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन


प्राथमिक आरोग्य केंद्र, कुमठे यांच्या वतीने परमाळे येथे वाघजाई देवी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेला आरोग्य मेळावा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या मेळाव्यात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच मोफत आरोग्य तपासणी, मातृ व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, औषध वितरण तसेच आरोग्य मार्गदर्शन अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या मार्फत विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अनेक नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक मार्गदर्शन व पुढील उपचारांबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ नेत्रसेवेचा लाभ मिळाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पूजाताई मोरे मॅडम (जिल्हा परिषद सदस्या), प्रमिला सुतार मॅडम (पंचायत समिती सदस्या), सुरेंद्र देशपांडे साहेब (खरेदी-विक्री संघ संचालक), निलमताई साळुंखे (सरपंच, पिलाणीवाडी), राजू साळुंखे (अध्यक्ष, शिव संस्कृती प्रतिष्ठान), जयसिंग कदम (सरपंच, परमाळे) आणि श्री अशोक कदम (फौजी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच डॉ. अतुल इंगळे (एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल), श्री साहिल शेख सर, श्री महेश यादव साहेब (कर्तव्य सोशल ग्रुप), श्री दिलावर पत्रेवाले, डॉ. किशोर हजारे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. सुप्रिया बनकर (वैद्यकीय अधिकारी), श्री राजेश पवार (आरोग्य सेवक), श्री बाबू अडके (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्यासह कुमठे आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व पंचक्रोशीतील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कर्तव्य सोशल ग्रुप आणि सर्व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे कौतुक केले.

या यशस्वी आरोग्य मेळाव्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुमठे, कर्तव्य सोशल ग्रुप, ग्रामपंचायत परमाळे तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आरोग्य मेळावा यशस्वी ठरला असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

"आपले आरोग्य... आपली जबाबदारी!" या संदेशाचा प्रसार करत सुदृढ आरोग्य, समृद्ध कुटुंब आणि सक्षम समाज घडविण्याचा संकल्प या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.

99
5879 views

Comment