logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जालना : लाचखोरी प्रकरणात तक्रारदाराला गोंदी पोलिसांनी अटक

जालना : बीड आणि जालना जिल्ह्यात एका दिवशी दोन लाचखोरी प्रकरणांनी महाराष्ट्रातील भ्रष्ट प्रशासकीय सेवेचा गंभीर दाखला दिला आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नावाने उघड झालेल्या लाच प्रकरणानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या असून, उच्च पदस्थ व्यक्तीकडून लाच घेतल्याबद्दल संताप व्यक्त झाला आहे.

या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. लाचखोरी संदर्भातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालन्यातील गोंदी पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग सोळुंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू चोरीचे दोन गुन्हे दाखल होते, पण त्याला आतापर्यंत अटक का झाली नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हाही नोंदवण्यात आला होता आणि त्याला जामीनावर सुटका करण्यात आलेली आहे.

13
300 views

Comment