logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

युवा क्रांती जिल्हा व तालुका पदाधिकारी कमिटी पूर्ण करण्याबाबत सूचना

युवा क्रांतीच्या जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना सूचित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील युवा क्रांतीची पदाधिकारी कमिटी पूर्ण करावी. जिल्हाध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्षा यांनी प्रथम आपल्या जिल्ह्यातील उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, संपर्क प्रमुख, संघटक, सल्लागार, मार्गदर्शक व कायदेशीर सल्लागार यांसह सर्व पदे भरून कमिटी पूर्ण करावी. कायदेशीर सल्लागार पद वकिलांसाठी राखीव आहे.

तालुकाध्यक्षांनीही उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, संघटक, संपर्क प्रमुख, सल्लागार, मार्गदर्शक व कायदेशीर सल्लागार पदे भरून तालुक्यातील कमिटी पूर्ण करावी. जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना सर्व पदे भरण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. कमिटी लवकरात लवकर पूर्ण न केल्यास पद रिक्त करण्यात येतील व ती पदे निष्ठावंत सदस्यांना दिली जातील. माजी जिल्हाध्यक्ष किंवा माजी तालुकाध्यक्षांना कार्डची वैधता आहे तोपर्यंत काम करण्याची संधी दिली जाईल. ही सूचना रविंद्र सूर्यवंशी (संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी दिली आहे.

12
629 views

Comment