logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अंतूर्लीतील गारपीटामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान

अंतूर्ली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव : अचानक आलेल्या गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्या असून झाडे कोसळली आहेत आणि तयार फळांचेही मोठे नुकसान झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मनोहर कुंभार यांनी याबाबत माहिती दिली.

11
405 views

Comment