logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

युवा क्रांती ऑनलाईन मिटिंगत संघटनेच्या कार्यावर चर्चा

पुणे : युवा क्रांती संघटनेची ऑनलाईन मिटिंग दि. 7 जून 2026 रोजी रात्री 9 ते 11.15 वाजता झाली. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश्वर हेंद्रे यांच्याद्वारे मिटींगची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. महिन्यातून दोन सभा, एक विशेष सभा आणि एक सर्वसाधारण सभा याबाबत चर्चा झाली. यूट्यूब चॅनेल सुरू केल्याची माहिती देण्यात आली आणि सदस्यांना त्याला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करण्यात आले.



मिटींगमध्ये पुणे जिल्हा सदस्य राजश्री वाघमारे यांनी लहान मुलींच्या सुरक्षेबाबत, शाळा कॉलेजमध्ये उपक्रम घेण्याबाबत आणि घटस्फोटाच्या प्रकरणांवर कौन्सिलिंगची गरज यावर चर्चा केली. डोंबिवली सदस्य मालती जोशी यांनी शाळेतील उपक्रम आणि युवा क्रांती आयडीचा प्रभाव सांगितला. ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष हारवडे यांनी पदाधिकाऱ्यांकडून काम न झाल्यास पदांवरील कारवाईची मागणी केली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल रेळेकर यांनी शालेय सुरक्षेवर भाष्य केले आणि आगामी पालखी कार्यक्रमात सहभागासाठी आग्रह धरला. इतर जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी संघटनेतील कामकाज, पदाधिकारी बदल, तसेच भ्रष्टाचारविरोधी लढ्याबाबत आपले विचार मांडले.



संस्थापक व अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी युवा क्रांतीच्या कार्यपद्धती, सदस्यत्वाचे प्रकार, भ्रष्टाचारविरोधी कामगिरी आणि सामाजिक न्यायासाठी संघटनेचा महत्त्व यावर सविस्तर भाषण केले. त्यांनी सदस्यांना निर्भीडपणे कार्य करण्याचे आवाहन केले. 31 मे ची विशेष सभा, आयडी वितरण धोरण, महाराष्ट्र भूषण पुरस्कार याबाबत निर्णय आणि आगामी योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व जिल्हाध्यक्षांना पदाधिकारी कार्यक्षमतेनुसार बदल करण्याचे निर्देश देण्यात आले.

18
488 views

Comment