logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

#प्रादेशिक #परिवहन कार्यालय, #लातूर मार्फत परराज्यातील नोंदणीकृत #प्रवासी #बसेसवर #धडक #कारवाई* लातूर: प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), लातूर मार

परराज्यातील प्रवासी बसेसवर आरटीओची धडक कारवाई; ५ बसेस जप्त, एक लाखांहून अधिक दंड

लातूर, दि. ७ – प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), लातूर यांनी ६ आणि ७ जून २०२६ रोजी विशेष रात्र तपासणी मोहीम राबवून परराज्यात नोंदणीकृत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी बसेसविरोधात कठोर कारवाई केली. या मोहिमेत ७९ बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७ बसेस दोषी आढळल्या. संबंधित वाहनांकडून एकूण १ लाख २ हजार ९२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ५ बसेस जप्त करण्यात आल्या आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान परराज्यातील प्रवासी वाहनांकडून होणारी करचुकवेगिरी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे उल्लंघन यावर विशेष भर देण्यात आला.

विशेषतः बसमधील आपत्कालीन दरवाजासमोर सामान किंवा इतर अडथळे ठेवून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांना आरटीओ प्रशासनाने गंभीरतेने घेतले.

मोहिमेदरम्यान तपासण्यात आलेल्या ७९ बसेसपैकी ७ बसेस नियमभंग करताना आढळल्या. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून १,०२,९२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ५ बसेस जप्त करून त्या लातूर आणि अहमदपूर येथील एसटी डेपोमध्ये अटकावून ठेवण्यात आल्या आहेत.

ही कारवाई वायुवेग (फ्लाइंग स्कॉड) पथकाच्या माध्यमातून करण्यात आली. पथकात प्रमोद सरोदे, पृथ्वीराज गायकवाड, अंजली पाथरे, राहुल राठोड, सुनील गिते, श्रीराम क्षीरसागर, मकरंद जायभाये, राहुल देवगुंडे, पवन दरेकर, दिपाली जाधव, अश्विन सोनकांबळे, सुरेश माळी, सचिंद्रकुमार राठोड, शिवाजी सोनटक्के, किरण गोंधळे, सागर भोसले आणि अभिजीत रिळे यांचा सहभाग होता.

प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राखणे आणि शासकीय महसुलाचे नुकसान रोखणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले.

4
275 views

Comment