logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दीड लाख वेतन; अंबडच्या तहसीलदारास...

घरासमोरच ६ लाख ४० हजारांची लाच घेताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. दरम्यान, लाचखोर चव्हाणला अटक झाल्याचे कळताच शहागडला वाळू माफियांनी 'फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

: असा रंगला पाठशिवणीचा खेळ तक्रारदाराच्या वाळू वाहतुकीच्या अवैध व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी चव्हाण याने मोठी मागणी केली होती. याप्रकरणी एसीबीकडे २६ मे रोजीच तक्रार आली होती आणि त्याच दिवशी तिची पडताळणीही झाली होती. शनिवारी सुट्टी असल्याने तहसीलदार चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर येथील वेस्ट बीड बायपास रोडवरील कासलीवाल मार्वल सोसायटीतील त्यांच्या घरीच (रो हाऊस नं. ११९) होते. लाच स्वीकारण्यासाठी त्यांनी तक्रारदाराला बोलावले

खरे, पण मनात एसीबीची धास्ती असल्याने त्यांनी तब्बल ८ वेळा भेटण्याची ठिकाणे बदलली. अखेर स्वतःच्या घरासमोरच त्यांनी लाचेची रक्कम घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी ते घराबाहेर आले. मात्र, एसीबीचे पथक आधीच दबा धरून बसले होते. तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे हाताचा विशिष्ट इशारा करताच, पथकाने चव्हाण यांना ताब्यात घेतले. वाळूमाफियांसाठी रोजचा दीड लाखांचा रेट' तक्रारदाराच्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी आणि ६ हायवा टिप्परद्वारे वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी चव्हाण याने दीड लाख रुपये प्रतिदिवस याप्रमाणे आठ दिवसांचे १२ लाख रुपये आणि प्रति टिप्पर ५० हजार रुपये याप्रमाणे ३ लाख रुपये अशी लाचेची मागणी केली होती

17
802 views

Comment