शिवसेना शिंदे गटाचा उत्तर महाराष्ट्र शिव संवाद दौरा...!
शिवसंवाद दौरा : रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर विधानसभा आढावा बैठक
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी शिवसंवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख, बीएलए आणि शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठका संपन्न झाल्या. या बैठकांमध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, मतदार संपर्क अभियान, पक्षविस्तार आणि मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक गाव, प्रभाग आणि बूथवर शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही करण्यात आले. तसेच नवमतदार नोंदणी, पात्र मतदारांची नावे कायम ठेवणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे आणि बोगस नोंदींबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, खासदार मा. श्री. मिलिंद देवरा, सर्वश्री आमदार किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील, लोकसभा संपर्क प्रमुख दिलीप लांडे, रावेर संपर्क प्रमुख तुकाराम काते, राज्य संघटन प्रमुख मा. आनंद परांजपे, शिवसेना सचिव मा. भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख शिरीष चौधरी, महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिता माळी, माजी खासदार उन्मेष पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, रावसाहेब पाटील, विष्णू भंगाळे, वासुदेव पाटील, पाचोरा नगराध्यक्षा सुनीता पाटील, भडगाव नगराध्यक्षा रेखा मालचे, चोपडा नगराध्यक्षा नम्रता पाटील, नगराध्यक्षा संजना पाटील, अमळनेर नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, माजी सभापती राजेंद्र चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नगरसेवक मंदार केणी, सुमित पाटील, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ, युवासेना उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे, युवासेना समन्वयक प्रथमेश पाटील, युवासेना लोकसभा संपर्क प्रमुख निखिल चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक शर्मिला येवले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.