logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*लिंगनिदान प्रकरणी १९ वा आरोपी मेडीकलवाला क्रेटासह पकडला*

*लिंगनिदान प्रकरणी १९ वा आरोपी मेडीकलवाला क्रेटासह पकडला*

श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी गेल्या महिन्यात लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.पुणे येथून अटक करण्यात आलेला मेडिकल साहित्याचा होलसेल विक्रेता नरेंद्र ठाकरे याला अटकेदरम्यान सविस्तर विचारपूस करण्यात आली होती.नमूद आरोपी हा अवैध लिंगनिदान चाचणी करण्यासाठी लागणारे मशीन उपलब्ध करून देत होता.त्यात त्याने माहिती दिलेल्या आणखी एका मेडिकल वाल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस मागील १० दिवसापासून पाठपुरावा करत होते.आज शनिवारी सदरचा आरोपी हा श्रीगोंदा तालुक्यातील आरडगाव या गावी शेतामध्ये एका झोपडीत आल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आरोपीला ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या.
पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीची माहिती खालील प्रमाणे-*नाव-जालिंदर रामदास बोरुडे, चाळीस वर्षे,राहणार-घोगरगाव,तालुका श्रीगोंदा असून तो घोगरगाव मध्ये मेडिकल चालक आहे.या अटक आरोपीकडून बेकायदेशीर लिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे व बेकायदेशीरपणे खरेदी केलेले सोनोग्राफी मशीन मिळून आले असून सदरचे मशीन त्याच्याकडील क्रेटा या चारचाकी गाडीत मिळून आल्याने मशीन तसेच चार चाकी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे त्यापैकी सहा डॉक्टर आहेत.तर तिघे जण मेडिकल चालक आहे व एक जण मेडिकल साहित्याचा पुरवठा करणारा मोठा पुरवठादार आहे.*
याशिवाय गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात अवैध गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण 5 सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच ०४ चारचाकी गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहे.आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल महादेव प्रकाश कोहक व संदिप पोपट राऊत,
दोघे नेम- श्रीगोंदा पोलीस स्टेशन, यांनी विशेष मेहनत घेतली.गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
1433 views

Comment