logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

समृद्धी महामार्गावरील अपघातात ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू , वडिलांसह तिघेजण गंभीर जखमी

शहापूर/साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी झालेल्या अपघातात सात वर्षाच्या परम पंचाळ या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तर तिघेजण या अपघातात गंभीर जखमी असून परम याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिऱारोड येथील पंचाळ कुटुंबासह अन्य दोन कुटुंबांतील एकूण १३ सदस्य त्र्यंबकेश्वर, शिर्डी आणि शनि-शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हल्सने नाशिकच्या दिशेने रवाना झाले होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील कसारा हद्दीतील इगतपुरी बोगद्यातून प्रवास सुरू असताना ट्रॅव्हल्सने पुढे चाललेल्या अवजड कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या परम पंचाळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर जाधव, पोलीस नाईक के. बी. झोंबाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर जखमींना तत्काळ बाहेर काढून घोटी ग्रामीण रुग्णालय तसेच एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत.

30
1252 views

Comment