logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अवैध वाळूसाठ्याप्रकरणी ठेकेदाराला पाच कोटींचा दंड




चोपडा : तालुक्यातील निमगव्हाण येथे १७०० ब्रास अवैध वाळूसाठा (अंदाजित किंमत ५४ लाख रुपये) जप्त करण्यात आला होता. याबाबत वाळू ठेकेदार प्रदीप युवराज शहा (रा. चहार्डी, ता. चोपडा) यांना ४ कोटी ९३ लाख रुपयांचा दंड केला आहे. याबाबत तहसीलदार 'भाऊसाहेब थोरात यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

मौजे चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात साठवणूक होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला मिळाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार २८ रोजी पहाटे अवैध वाळूसाठा जप्तीची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि त्यांच्या पथकाने केली. यात १७०० ब्रास

वाळूसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा चामुंडा सप्लायर्स अँड कन्स्ट्रक्शनचा होता. निमगव्हाण येथील अवैध वाळू उत्खननाबाबत स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या; मात्र त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्यावर तहसीलदारांनी वरील कारवाई केली. सावखेडा (ता. अमळनेर) येथील अवैध वाळू साठ्याप्रकरणी १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. या प्रकरणी अमळनेर येथील सर्कल, तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

1
373 views

Comment