logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी

महाराष्ट्र : राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA Maharashtra) धडक मोहीम राबवली आहे. गेल्या 6 दिवसांत 203 छापे टाकण्यात आले असून, त्यामध्ये 102 लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच 68 दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाईची घोषणा केली असून, आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत न दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी जनतेला थेट तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर आणि ई-मेल आयडी दिला आहे, ज्यामुळे नागरिकांना गुटखा आणि पानमसालासंदर्भातील तक्रारी थेट प्रशासनाकडे करता येतील.

13 views

Comment
  • Shaikh Feroz Sattar

    अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर- (FDA Complaint Number) टोल फ्री क्रमांक : 1800222365 ई-मेल : jc-foodhq@gov.in