logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अंबड तहसीलदार विजय चव्हाण लाचलुचपत प्रकरणी ताब्यात

अंबड : अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. एसीबीची या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराकडून वाळू उपसा करणाऱ्या पोकलँड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या सहा ट्रकांना परवानगी देण्यासाठी तहसीलदारांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रारीच्या पडताळणी नंतर लाच मागणीची पुष्टी झाल्याने विभागाने सापळा रचून तहसीलदाराला पकडले.

0
0 views

Comment