logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्ह्यातील खेळाडूंनी कुस्ती खेळाला जवळून पाहिले पाहिजे - उमेश कोर्राम जागतिक कुस्ती दिनानिमित्त

जिल्ह्यातील खेळाडूंनी कुस्ती खेळाला जवळून पाहिले पाहिजे - उमेश कोर्राम
जागतिक कुस्ती दिनानिमित्त

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- प्रतिकुल परिस्थितीवर मात करून कुस्ती पट्टू स्व. खाशाबा जाधव यांनी देशाच्या पातळीवर भारताचे नाव लौकिक केले आहे. कुस्ती हा एक प्राचीन आणि सर्वांगीण शारिरिक व्यायाम असलेला खेळ आहे. जो शरिराला बळकट, काटक बनवण्यासोबत मानसिक ताकद आणि आत्मविश्वास वाढवितो. यामुळे चपळता, सहनशक्ती, शिस्त आणि आत्मसरंक्षणाचे कौशल्य विकसित होत असते. विदर्भ हा कुस्ती खेळाकरिता प्रसिद्ध होता. मात्र आजचे युवक-युवती मोबाईलच्या जाळ्यात अडकले दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात कुस्ती खेळाडू दिसत नाहीत. म्हणून जिल्ह्यातील कुस्ती खेळाडूंनी कुस्ती खेळाला जवळून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर यांनी केले.
ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा व जाणता राजा कुस्ती स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कुस्ती दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.
सदर कुस्ती प्रशिक्षण शिबिर क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सावनकुमार व जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, क्रीडा अधिकारी निखिलेश तभाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ओबीसी युवा अधिकार मंचाचे मुख्य संयोजक तथा स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन चे अध्यक्ष उमेश कोर्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष मदान होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, पतंजलि योग समिती खोकरला चे अध्यक्ष यशवंत बिरे, ओबीसी सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, कुस्ती खेळाडू तथा महाराष्ट्र पोलीस शैलेश मारवाडे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, वस्ताद रामनरेश सिंग ठाकूर, बुधवारी पेठ हनुमान व्यायाम शाळेचे प्रशिक्षक प्रविण लिमजे, कुस्ती प्रशिक्षक तथा जाणता राजा कुस्ती स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव अशोक बन्सोड, मार्गदर्शक विलास केजरकर, पहेलवान शुभम बागडे, मयुर चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीर हनुमान (बजरंग बली) यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलित व मार्ल्यापण करून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यात होतकरू मुला- मुलींकरिता नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे व त्याचे नियोजन करण्यासाठी सतत पाठपुरावा करून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी करिता चालविले ही संघटनेची जमेची बाजू आहे असे मत पतंजलि योग समिती खोकरला चे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी ऑलिपीकवीर स्व. खाशाबा जाधव यांची जिवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याबाबत आणि ग्रिष्मकालीन कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा महत्त्वाकांक्षी विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी ग्रिष्मकालीन कुस्ती प्रशिक्षण शिबिराला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मार्गदर्शक विलास केजरकर व उपस्थितांचे आभार महाराष्ट्र कुस्ती पंच अशोक बन्सोड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आशिष देशकर, प्रज्वल शहारे, सम्यक भिवगडे, श्रध्दा लुटे, अक्षरा मने, सार्थक कढव, तन्मय मते, मनिष वाडिभस्मे, आस्था क्षिरसागर, ऋषभ क्षिरसागर, अलिशा नंदनवार, आर्या सार्वे, सारांश बन्सोड, नशीब उके, तसेच कुस्ती क्रीडा क्षेत्रात भाग घेणाऱ्या खेळाडू विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment