logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सावखेडा वाळूघाट प्रकरणी सर्कल व तलाठी निलंबित



जळगाव : सावखेडा, ता. अमळनेर येथील

वाळू घाटावर नियमबाह्य पध्दतीने मशिनीच्या माध्यमातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याचा प्रकार २६ मे रोजी महसूल पथकाच्या छापेमारीत उघड झाला होता. याप्रकरणी सावखेडा येथील मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.

सावखेडा येथील वाळूघाटप्रकरणी अमळनेर व चोपडा तहसीलदार तसेच तलाठी व मंडळाधिकारी अशा सहा जणांना गेल्या आठवड्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. खुलासा सादर होताच जिल्हाधकिारी रोहन घुगे यांनी शुक्रवारी वरील दोघांवर निलंबनाची कारवाई केली.

15
1239 views

Comment