logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड : *सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना अतुल्य भारत पुरस्कार जाहीर झाला आहे



नांदेड : *सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना ‘अतुल्य भारत पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा सन्मान 14 जून 2026 रोजी अमरावती येथे आयोजित राष्ट्रीय प्रज्ञा अलंकरण समारोह एवं संत समागम 2026 या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे हा ॲड. दिलीप ठाकूर यांना प्राप्त होणारा 114 वा पुरस्कार ठरणार आहे.*

हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. 14 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सभागृहात संपन्न होणार आहे. ज्ञान उदय फाउंडेशन आणि रेडियम टॅलेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नेचर पाथ प्रायव्हेट लिमिटेड यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.
राष्ट्रीय स्तरावर आयोजित या कार्यक्रमात देशभरातील संत, विचारवंत, समाजसेवक, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. संत समागम, आध्यात्मिक विचारगोष्ठी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान अशा बहुआयामी उपक्रमांनी हा सोहळा सजणार आहे.

धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहित्यिक क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, जनजागृतीपर मोहिमा राबविणे, सामाजिक सलोखा वाढविणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे तसेच विविध सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे मागील एका वर्षात त्यांनी राबविलेल्या सुमारे 90 विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि जनजागृतीपर उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजहिताच्या कार्यात सातत्य, निस्वार्थ वृत्ती आणि लोकसहभागातून परिवर्तन घडविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे कार्य राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा ॲड. दिलीप ठाकूर यांना प्राप्त होणारा 114 वा पुरस्कार ठरणार आहे. विविध संस्था, संघटना आणि सामाजिक मंचांनी त्यांच्या कार्याची यापूर्वीही दखल घेत अनेक सन्मानांनी गौरविले आहे. आता ‘अतुल्य भारत पुरस्कार’ या स्वरूपात त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव होत आहे.याहूनही विशेष म्हणजे अमरावती हे ॲड. दिलीप ठाकूर यांचे सासरचे शहर आहे. त्यामुळे आपल्या सासुरवाडीत मिळणारा हा सन्मान त्यांच्या दृष्टीने अधिक भावनिक, संस्मरणीय आणि अभिमानास्पद ठरणार आहे. ज्या शहराशी त्यांचे कौटुंबिक नाते जोडलेले आहे, त्याच शहरात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात विशेष आनंदाचे वातावरण आहे.

या पुरस्कारामुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, जिल्ह्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही गौरव प्राप्त होणार आहे. ॲड. दिलीप ठाकूर यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संस्था, साहित्यिक, पत्रकार, मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.समाजकारण, संस्कृती संवर्धन आणि अध्यात्मिक मूल्यांचा प्रचार-प्रसार यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान भविष्यातील त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment