logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लालठाणे जिल्हा परिषद शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साहित्य वाटप

सफाळे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लालठाणे येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. DYWIDAG BRIDGECON INDIA PVT. LTD. कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शाळेसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत लालठाणेच्या विद्यमान सरपंच सौ. प्रिया प्रताप कामडी, उपसरपंच सौ. मृण्मयी चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

69
4115 views

Comment