logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सफाळे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साहित्य वाटप कार्यक्रम

सफाळे : जिल्हा परिषद शाळा, लालठाणे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात DYWIDAG BRIDGECON INDIA PVT. LTD. कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि शाळेसाठी आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत लालठाणेच्या विद्यमान सरपंच सौ. प्रिया प्रताप कामडी, उपसरपंच सौ. मृण्मयी चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करून वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

2
286 views

Comment