logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पालघरमध्ये दोन भीषण रस्ते अपघात; दोन तरुणींचा मृत्यू

पालघर: पालघर जिल्ह्यात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे. वाणगाव येथील विक्रमनगर परिसरात प्राप्ती प्रवीण जाधव या महाविद्यालयीन प्रवेशासाठी जात असताना भरधाव ट्रकने तिच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात प्राप्तीचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

दुसरी घटना बोईसर-चिल्हार मार्गावरील खैरापाडा उड्डाणपुलाजवळ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव अवजड वाहनाने कृष्णा प्रभा (वय २८) या तरुणीच्या स्कुटीला धडक दिली. वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनांमुळे पालघर जिल्ह्यात रस्ते सुरक्षा आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

98
3368 views

Comment