logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१०० रुपयांची लाच घेताना तरुणी रंगेहाथ जाळ्यात

जळगाव : शासनाच्या योजनेतर्गत

अत्यावश्यक संच व सुरक्षा संच घेण्यासाठी गेलेल्या तक्रांदाराला संच वाटप केंद्रावरील खासगी व्यक्ती असलेल्या भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा.सामनेर, ता. जळगाव) या तरुणीला शंभर रुपयांची लाच घेतांना गुरुवारी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.. याप्रकरणी तरुणीजवळ असलेल्या डब्ब्यातून लाचेपोटी स्विकारलेली २६ हजार ७७० रुपयांची रोकड हस्तगत
करण्यात आली.

तक्रादार यांनी ३ जून रोजी अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्याकरीता नोंदणी केली होती. ४ जून रोजी संच घेण्याकरीता जळगाव तालुक्यातील वावडदा येथे संच वाटप केंद्रावर गेले होते. या केंद्रावर असलेल्या भाग्यश्री पाटील यांनी तक्रादार यांना तुमची केवायसी करीता दोन फॉर्म विकत घ्यावे लागतील त्याकरीता शंभर रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रादार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, पथकाने संच स्विकारण्यासाठी लाच घेतांना भाग्यश्री पाटील यांना रंगेहाथ पकडले.

8
917 views

Comment