logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

समता सैनिक दल दीक्षाभूमी, नागपूर ग्रामीणची शाखा बैठक संपन्न..

समता सैनिक दल दीक्षाभूमी, नागपूर ग्रामीणची शाखा बैठक संपन्न..
काटोल प्रतिनिधी :-
दिनांक 05 जून 2026 रोजी समता सैनिक दल दीक्षाभूमी, नागपूर ग्रामीणच्या वतीने काटोल येथे सिल्लोरी, सिंधी उमरी, हातला व पारडसिंगा शाखेची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली.
मुख्य संयोजक घनश्यामजी फुसे व ज्येष्ठ समन्वयक राजरतनजी कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीला समता सैनिक दल नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष विद्धेश्वर उर्फ बंडू गजबे, कमांडर डॉ. सुनीलजी नारनवरे, सचिव दीपकजी ढोके, मुख्य शाखा संघटक भागवतजी पाटील, शाखा संघटक विकासजी सोमकुवर, पारडसिंगा सर्कल प्रमुख नीलकंठजी गजभिये, सावरगाव सर्कल प्रमुख लांजेवार सर, प्रमुख पाहुणे राजेंद्र निकोसे तसेच महिला प्रमुख लक्ष्मीबाई शेंडे, कमांडर संध्याताई सहारे, शाखा संघटक संगीताताई निकोसे, कांताबाई गजभिये व अनिताताई मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान सर्व शाखांच्या अध्यक्ष व सैनिकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. समता सैनिक दलाचे ध्येय, धोरणे व उद्दिष्टे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आगामी प्रशिक्षण शिबिरे, बैठका, संघटन बांधणी आणि विस्तार यासंदर्भात चर्चा करून नियोजनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन सचिव दीपकजी ढोके यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखा संघटक विकास सोमकुवर यांनी केले.

3755 views

Comment
  • deepak s dhoke

    Nice one, keep it up

  • deepak s dhoke

    Nice one, keep it up