भालर कार्यकारी संस्थेचे अध्यक्षपद महेश भाऊ देठे यांना
भालर (ता. वणी) : भालर विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी महेश भाऊ देठे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संस्थेच्या नेतृत्वात नवीन अध्याय सुरू होईल.
महेश भाऊ देठे यांनी सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती होऊन शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे भालर परिसरातील सहकार चळवळीला अधिक बळ मिळणार असून संस्थेच्या विकासासाठी नवे उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महेश भाऊ देठे यांना अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
- प्रतिनिधी , भालर