भोसले व्हिलेज नागरिकांनी नगरसेवक चंद्रकांत ढमाळ यांचे आभार मानले
भोसले व्हिलेज, भेकराईनगर : भोसले व्हिलेज आणि भेकराईनगर परिसरातील नागरिकांनी मुख्य रस्त्यावरील धोकादायक दुभाजकामुळे होणाऱ्या वाहतूक व सुरक्षेच्या समस्येबाबत नगरसेवक श्री. चंद्रकांत उर्फ पप्पू ढमाळ यांच्याकडे तक्रार केली होती. नगरसेवकांनी तात्काळ या समस्येची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून दुभाजकात आवश्यक बदल केले.
या बदलांमुळे परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडणे आणि दैनंदिन प्रवास करणे अधिक सुरक्षित व सोयीचे झाले आहे. नागरिकांनी नगरसेवक श्री. चंद्रकांत उर्फ पप्पू ढमाळ यांच्या तत्पर कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. भोसले व्हिलेज परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, लोकप्रतिनिधीने नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्वरित उपाययोजना केल्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.