logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिककरांनो, पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी सतर्क राहा

नाशिक : कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहरात विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले असून खड्डे आणि मातीचे ढिगारे दिसत आहेत. ड्रेनेज, गॅस पाईपलाईन आणि केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला परिस्थिती अधिक धोकादायक बनू शकते.

पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत, माती आणि पाण्यामुळे चिखल तयार होतो, ज्यामुळे दुचाकी चालवताना घसरणे आणि पादचाऱ्यांना तोल जाणे यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. काही ठिकाणी उघडी गटारे, तुटलेली झाकणे आणि रस्त्याच्या कडेला पडलेले बांधकाम साहित्यही धोका निर्माण करू शकते. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचना प्रभावीपणे पाळाव्यात आणि सुरक्षिततेसाठी काळजी घ्यावी.

0
90 views

Comment