logo

खा .रक्षाताई खडसे यांच्या विकास निधीतुन जामनेर उप जिल्हा रुग्णालयास १६ ऑक्सीजन कंन्संट्रेटर भेट

खा .रक्षाताई खडसे यांच्या विकास निधीतुन जामनेर उप जिल्हा रुग्णालयास 16 ऑक्सीजन कंन्संट्रेटर भेट
➖➖➖➖➖➖
जामनेर।  रावेर लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खा . रक्षाताई खडसे यांच्या स्थानिक विकास निधीतुन जामनेर उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 16 ऑक्सीजन कंन्संट्रेटर भेट म्हणुन देण्यात आले . माजी मंत्री आ . गिरीष महाजन यांच्या हस्ते अत्यावश्यक ऑक्सीजन मिटर देण्यात आले . काल झालेल्या जागतीक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर्स, बांधवांना खुप शुभेच्छा दिल्या .कोरोना हा आता बऱ्यापैकी प्रमाणात कमी झाला असुन दुसरी लाट संपत आहे .परंतु येणारी तिसरी लाट हि भयंकर असणार असल्याची पुर्व सुचना WHO व डॉक्टरां कडून देण्यात आली आहे . भेट म्हणुन दिलेल्या ऑक्सी मिटरचा फायदा तालुक्यासह शहरातील नागरीकांना होणार असून मध्यंतरीच्या काळात ऑक्सीजनचा साठा व पुरवठा कमी प्रमाणात असल्याने प्रशासनासह , डॉक्टर्स सह रूग्णाच्या नातेवाईकांना सुध्दा धावपळ मोठया प्रमाणात करावी लागली .परंतु आता खा .रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतुन ऑक्सी मिटर भेट दिल्याने खुप मोठा फायदा होणार आहे . नागरीकांनी सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी त्याच प्रमाणे कोरोनाची परीस्थीती पाहता मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये तसेच वेळोवेळी सोशल डिस्टंनसींगचे नियम पाळावे असे आवाहन आ . गिरीष महाजन यांनी केले . त्यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॅi. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, उल्हास पाटील, सुहास पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ .विनय सोनवणे, डॉ . हर्षल चांदा, कैलास पालवे, बाळु चवरे, सांरंगधर माळी , जगदिश सोनार , आरोग्य सेवक , कर्मचारी उपस्थीत होते।

3
14691 views