
पूर्व वैमनस्यातून विटनेर येथे एकावर धारदार शस्त्राने वार तर अन्य जखमी !
पूर्व वैमनस्यातून विटनेर येथे एकावर धारदार शस्त्राने वार तर अन्य जखमी !
जळगाव। विटनेर येथे काही दिवसांपूर्वी वाद झाला होता तर NCR दाखल केल्यामुळे त्याच्यामनात खुमखुमी असल्यामुळे शेतीच्या वादातून विरुद्ध पार्टीने सायंकाळी विजयसिंग भावसिंग परदेशी यांच्या वर धारदार शस्राने वार करून त्यांना व त्यांच्या परिवाराला जिवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे ठिक 8 वाजता त्यांच्या राहत्या घरात येऊन सहा जणांनी बेशुद्ध होई पर्यंत मारहाण केली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात जळगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे.
1.रामधन संजय परदेशी 2.राजेंद्र भावसिंग परदेशी 3.संजय भावसिंग परदेशी 4.अलका संजय परदेशी 5.पवन राजेंद्र परदेशी 6.रविंद्र राजेंद्र परदेशी. सर्व राहणार विटनेर यांनी अचानक विजयसिंग भावसिंग परदेशी यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने व लोखंडी बाबुने मारहाण केली असुन विजयसिंग भावसिंग परदेशी यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचार चालू आहे रात्री 1:30 वाजता MIDC पोलीस स्टेशनला उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन चे कर्मचारी करत आहेत.