logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुंबई नाशिक महामार्गावर आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू

शहापूर /साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

नाशिक महामार्गावर कासणे गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत प्रवास करणारी त्याची आई गंभीर जखमी झाली. वासींदच्या दिशेकडून वळण घेत असलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील खुटघर येथे राहणारे रितेश बसवंत (२९) हे त्यांची आई लक्ष्मीबाई बसवंत यांच्यासह दुचाकीवरून पडघा येथून शहापूरच्या दिशेने जात होते.

मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास कासणे गावाजवळ वासींदच्या दिशेकडून वळण घेत असलेल्या हायवा डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रितेश बसवंत यांचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मीबाई बसवंत गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले.या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली.

26
1505 views

Comment