logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

माळशिरस तालुका अध्यक्षपदी अकील कोरबु ग्राहक हक्क संरक्षणासाठी माळशिरस तालुका कार्यकारिणी जाहीर

प्रतिनिधी) - ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, जनजागृती आणि विविध ग्राहकविषयक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने नॅशनलिस्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन जागो ग्राहक जागो या संघटनेची माळशिरस तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत अकील कोरबू यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दि.०१ शासकीय विश्रामगृह अकलूज या ठिकाणी झालेला बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये यासीन शिकलकर यांची उपाध्यक्ष, सतीश कदम यांची सचिव, नितीन माने यांची सहसचिव, भगवान घुगरदरे
यांची संघटक, बादशाह शेख यांची खजिनदार, अभिजीत जाधव यांची युवक प्रतिनिधी, तर ड. इम्रान खान कोरबू यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय बाळासाहेब जगताप, कासलिंग घोडके आणि पंडित शिंदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीची अधिकृत पत्रे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नवनाथ गवळी, सोलापूर जिल्हाध्यक्ष जावेद पठाण, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीराम गायकवाड आणि सोलापूर जिल्हा सचिव दादा सय्यद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी
जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगत, संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. नव्याने नियुक्त झालेल्या कार्यकारिणीने तालुक्यात ग्राहक
जनजागृती अभियान राबवून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. नवनियुक्त पदाधिकान्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

6
786 views

Comment