logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शहापूर येथे विजेच्या झटक्याने महिला सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
कामावर जाण्यासाठी तयारी करीत असताना घरातील लोखंडी कपाट उघडताना विजेचा झटका लागून नगरपंचायतीतील महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहापूर शहरातील पठाणवाडा परिसरात घडली. सुलोचना विजय सातपुते (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.

नगरपंचायतीत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या सुलोचना सातपुते या मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचारी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची तयारी करीत होत्या. यावेळी घरातील लोखंडी कपाट उघडताच त्यांना अचानक विजेचा जोरदार झटका बसला.

हा प्रकार लक्षात येताच त्यांचे पती विजय सातपुते यांनी तातडीने घरातील मुख्य वीजपुरवठा बंद केला आणि सुलोचना यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.दरम्यान, लोखंडी कपाटाला विद्युतप्रवाह कसा आला आणि विजेचा झटका नेमका कशामुळे बसला याबाबत तपास सुरू असून शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

21
1048 views

Comment