logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उरूळी देवाची धनगर वस्ती राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.

उरूळी देवाची-( प्रतिनिधि अंबादास गोरे)

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या सुशासन, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात आला. राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.

या वेळी धनगर वस्ती या ठिकाणी गोरक्षक गुरवर्य मा.श्री पंडीत दादा मोडक, नगरसेवक सभागृह नेते मा श्री प्रशांत दादा भाडळे पाटिल, सरपंच लक्ष्मण आप्पा नेवसे, युवा नेते सोमनाथ भाऊ कर्हे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबूशेठ कोळेकर आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते. उपस्थितांनी जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणासाठी राजमाता अहिल्यादेवींच्या योगदानाला उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

6
3246 views

Comment