logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अकोट नगरपालिकेतील 18 वर्ष प्रलंबित गुंठेवारी प्रकरणावर प्रशासकीय निष्क्रियता

अकोट: अकोट नगरपालिकेच्या प्रशासनातील दिरंगाई आणि निष्क्रियतेमुळे मोहम्मद गाडी करमुल्ला मोहम्मद अफसरुल्ला यांचे गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रकरण 18 वर्षांपासून प्रलंबित आहे. 30 नोव्हेंबर 2008 रोजी महाराष्ट्र गुंठेवारी विकास कायदा, 2001 नुसार दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाला नगरपालिकेने जानेवारी 2009 मध्ये मंजुरी दिली, पण उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जून 2009 मध्ये त्रुटी दाखवून प्रस्ताव परत पाठविला आणि तब्बल 18 वर्षांपासून कोणतीही ठोस पुढील कार्यवाही झाली नाही.

6 मार्च 2018 रोजी अकोट नगरपालिकेच्या अभिलेख कक्षाला आग लागल्यामुळे संबंधित प्रकरणातील कागदपत्रे नष्ट झाली असून, त्रुटी पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्यासाठी नगरपालिकेने प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. तत्कालीन मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी आगीबाबत तक्रार दिली असली तरी नष्ट झालेल्या कागदपत्रांचा तपशील स्पष्ट नाही. माहिती अधिकार अपीलीय प्राधिकाऱ्यांनी पुनर्गठन आदेश दिल्यानंतरही ठोस कार्यवाही नाही, ज्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

10
352 views

Comment