logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप उमेदवार नंदकिशोरजी महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप उमेदवार नंदकिशोरजी महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)
सध्या राज्यभर महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ ची रणधुमाळी सुरू असून जळगाव विधानपरिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मा. नंदकिशोरजी महाजन यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला.

यापूर्वी राज्याचे जलसंपदामंत्री मा. ना. गिरीशजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मा. गिरीशजी महाजन यांनी जिल्ह्यात महायुती अधिक बळकट करण्यासह विधानपरिषद निवडणुकीत विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.

त्यानंतर मा.ना.गिरीशजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत मा.नंदकिशोरजी महाजन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण परिसर महायुतीमय झाला असून कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विजयाचा दृढ विश्वास स्पष्टपणे जाणवत होता.

जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, महायुतीतील तीनही पक्षांची विचारधारा आणि जनतेचा विश्वास यांना बळ देण्यासाठी मा. नंदकिशोरजी महाजन यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. आगामी निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय संपादन करून विकासाचा हा प्रवास अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी जळगांव लोकसभेच्या खासदार मा.स्मिताताई वाघ, मा.मंत्री गुलाबरावजी देवकर, चाळीसगांव विधानसभेचे आमदार मंगेशदादा चव्हाण, जळगांव विधानसभेचे आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल पाटील,मा.जि.प.सदस्य जयश्रीताई पाटील, जळगांव महानगरपालिकेच्या महापौर दीपमालाताई काळे,आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मुलगा सुमित पाटील व भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
0 views

Comment