logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भिवापूर येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा उमरेड च्या वतीने प्रशिक्षण शिबिर संपन्न .

भिवापूर : बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा उमरेड यांच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम भिवापूर येथे दि31मे2026रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा सागर बोरकर उमरेड यांनी केले .कार्यक्रमाचे उदघाटक मा साबिर पटेल पत्रकार भिवापूर यांचे हस्ते पार पडले
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी प्रशिक्षणादरम्यान महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .प्रमुख प्रशिक्षक मा डॉ. सुभाष सोमकुवर सर यानी बहुजन समाज हा हजारो वर्षांपासून लाचार व गुलाम का व कसा झाला याचा हजारो वर्षांपासून चा इतिहास समजावून सांगितला. गुलामी तून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला व्यवस्था परिवर्तनाकरीता जन आंदोलन उभे करण्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही असे सांगितले.
या कार्यक्रमात सहभागी मा. पुरोषोतम भिसीकर सर यानी ही आपले विचार मांडले तसेच मा अरूण कुमार तालेवार सर यानी सुध्दा मत व्यक्त केले

0
922 views

Comment