भंगार एस.टी. बस आणि भंगार मुरुड डेपो व्यवस्थापन?
मुरुड प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार नुकतीच रात्री १०:३० वाजता मुरुडबोरिवली बस सेवा सुरू करण्यात
🚨 भंगार एस.टी. बस आणि भंगार मुरुड डेपो व्यवस्थापन? 🚨
मुरुड – प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार नुकतीच रात्री १०:३० वाजता मुरुड–बोरिवली बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून बसची योग्य तपासणी न करता सेवा सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
📅 घटना : २४ मे २०२६
रात्री १०:३० वाजताची मुरुड–बोरिवली बस (क्र. MH 20 BL 3899) सुमारे ११ वाजता मुरुडहून बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली. बस पूर्णपणे प्रवाशांनी भरलेली होती.
रात्री सुमारे १२:५० वाजता कुरुळ परिसरात बसचा मागील टायर निखळून वेगळा झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या शटरवर जाऊन आदळला. बस सुमारे १० ते १५ मीटर पुढे गेल्यानंतर थांबवण्यात आली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका स्थानिक दुचाकीस्वाराने चालकाला बस थांबवून टायर निघाल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे बस जवळपास ५० किलोमीटर टायरशिवाय धावत होती, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
🔴 तपासणीत असे निदर्शनास आले की:
• टायरचे ८ नट निघून गेले होते.
• दुसऱ्या टायरचे नटही व्यवस्थित बसवलेले नव्हते.
• बस प्रवासासाठी सोडण्यापूर्वी योग्य तपासणी झाली होती का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रवाशांनी विचारले असता डेपो कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. चालक व वाहक यांनी "नट हाताने तपासले होते" असे सांगितले.
❓ प्रश्न उपस्थित होतो:
• डेपोतील मेकॅनिक बसची संपूर्ण तपासणी करतात का?
• लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुरक्षित असल्याची खात्री केली जाते का?
• अशा गंभीर त्रुटींकडे दुर्लक्ष का केले जाते?
मुरुड डेपोतील बसांमध्ये सीट, खिडक्या व इतर तांत्रिक समस्यांच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. देवाची कृपा म्हणून ही घटना सरळ रस्त्यावर घडली; एखाद्या वळणावर घडली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
🙏 विनंती
मुरुडहून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सर्व बसांची काटेकोर तपासणी करण्यात यावी. ज्या दर्जाच्या आणि सुरक्षित स्थितीतील बसेस लांब पल्ल्याच्या मार्गांवर सोडल्या जातात, त्याच दर्जाच्या बसेस मुरुड मार्गावरही उपलब्ध करून द्याव्यात.
मुरुड डेपोतील संबंधित अधिकारी व व्यवस्थापन यांनी या गंभीर घटनेकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी, ही नम्र विनंती.
⚠️ प्रवाशांचा जीव अमूल्य आहे – निष्काळजीपणाला माफी नाही!