निमोण गावातील आदिवासी विद्यार्थ्यांचा इंडियन आर्मीमध्ये प्रवेश
निमोण : निमोण गावातील आदिवासी समाजातील व ओ.बी.सी.समाजातील विद्यार्थ्यांनी इंडियन आर्मीमध्ये प्रवेश केला आहे. हे दोघे विद्यार्थ्यांचे यश आदिवासी समाजासाठी प्रेरणादायक आहे.
निवड झालेले विद्यार्थी विशाल राजु माळी व सौरभ संजय उगले यांच्यामुळे निमोण गावाचे नाव इंडियन आर्मी मध्ये कोरले गेले. या त्यांच्या यशासाठी त्यांच्या कुटुंब परिवाराने हाल अपेष्टा सहन करून त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.
या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत आणि समर्पणाने इंडियन आर्मीमध्ये स्थान मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील इतर तरुणांमध्ये उत्साह वाढला आहे.
पुढील वाटचालीस या दोन विद्यार्थ्यांना निमोण गावातर्फे व यादगार युवा प्रतिष्ठान तर्फे खूप खूप शुभेच्छा.