logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मालेगाव महानगरपालिकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली

मालेगाव : दिनांक ३१ मे २०२६ रोजी मालेगाव शहर महानगरपालिकेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय आयुक्त रविंद्र यांनी केले. सहाय्यक आयुक्त दिनेश मोरे आणि प्रभाग अधिकारी सचिन महाले यांच्या हस्ते तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदर्शी नेतृत्व, न्यायप्रिय प्रशासन, लोककल्याणकारी कार्य आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून भारतीय इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले आहे. महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे आणि इतर अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांचे कार्य गौरवले व त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

5
153 views

Comment