logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सोलापूर: खासदार प्रणिती शिंदे यांचा गोकुळ शुगरच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

सोलापूर (प्रतिनिधी-अंबादास गोरे)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिले मिळावीत या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी संसद ते रस्त्यावर संघर्ष करण्याची ग्वाही दिली.

खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकार आणि साखर कारखाना व्यवस्थापनावर कठोर टीका करत सांगितले की, ऊस बिलासाठी चालू असलेले उपोषण सहा दिवसांपासून सुरू आहे आणि शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत बिल मिळणे आवश्यक आहे. त्यांनी या विषयावर संसदेतही चर्चा केली असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ते अंतिमपर्यंत लढणार असल्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या संकटात सरकारची दुर्लक्ष आणि कारखानदारांच्या मिलीभगतीमुळे अन्याय होत असल्याचा त्यांनी आरोप केला.

18
5452 views

Comment