logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बेलसर टोलमध्ये १ जूनपासून नवीन ठेकेदार आणि स्थानिकांसाठी ₹३५० मासिक पास

बेलसर : १ जूनपासून बेलसर टोल नाक्याचा ठेकेदार बदलणार असून, स्थानिक वाहनधारकांसाठी ₹३५० मासिक पास लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या घोषणेने स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अनेकांनी या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या मार्गाचा रोजच्या कामासाठी, शिक्षणासाठी, शेतीसाठी आणि व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्या स्थानिकांना टोलमुक्त प्रवासाऐवजी मासिक पास काढावा लागणार असल्याने अनेकांची नाराजी व्यक्त केली जात आहे. टोल प्रशासनाने याबाबत स्पष्टता देण्याची मागणी स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

1
858 views

Comment