बेलसर टोल नाक्यावर नवा वाद पेटणार?
बेलसर : १ जूनपासून बेलसर टोल नाक्याची देखभाल नवीन ठेकेदाराकडे हस्तांतरित होत आहे. याच वेळी, स्थानिक वाहनधारकांसाठी ₹३५० मासिक पास आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अनेकांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत स्थानिकांना टोलमुक्त सुविधा मिळणे अपेक्षित असल्याचे मत मांडले आहे.
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी यांना दररोजच्या कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि शेतीसाठी या मार्गाचा वापर करता येतो. त्यामुळे त्यांना मासिक पास काढावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवीन ठेकेदाराच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला उभा राहिलेला हा मुद्दा सध्या पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे आणि टोल प्रशासनाकडून याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात येत आहे.