आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार.
आज छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डूवाडी च्या प्रांगणात कुस्तीसम्राट आस्लम काझी यांचा ४४ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात, अलोट गर्दीत, दर्दी कुस्ती शौकीनांच्या सानिध्यात साजरा होणार आहे. आस्लम काझी यांच्या वर आजही लोक किती प्रेम करतात तो पाहण्याचा दिवस आहे.
या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षांपासून कुस्ती मैदान घ्यायला सुरुवात केली आणि आज तिसऱ्या वर्षी तिसरे मैदान होणार आहे.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील अशी क्रमांक १ ला ४,५१,०००/- रुपयांवरती कुस्ती घेण्यात आली आहे. ज्या कुस्तीचा या सिझनला कुठेही निकाल लागला नाही तो कुर्डूवाडीत लागणार का? याची उत्सुकता लागली आहे. यासह इतरही अनेक काटा कुस्त्या यावेळी जोडल्या आहेत.
दुपारी ३ वाजता मैदान सुरु होईल.
या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री माननीय श्री. जयकुमारभाऊ गोरे, शिवसेना नेत्या, महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेणाऱ्या सिनेअभिनेत्री माननीय दिपाली सय्यद, सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे आजी- माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगराध्यक्षा, इतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच - उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी, विविध तालीम संघाचे अध्यक्ष, वस्ताद, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कोच, विविध शाळा, काॅलेजचे क्रिडा शिक्षक, आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विशेष सत्कारमूर्ती म्हणून शाहू विजयी गंगावेस तालीम संघाचे वस्ताद श्री. विश्वासदादा हारगुले, डबल महाराष्ट्र केसरी, तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माननीय चंद्रहारदादा पाटील, हिंदकेसरी माननीय श्री. संतोष आबा वेताळ यांचा सन्मान होणार आहे.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. भाऊसाहेब काळे करणार आहेत. तर कुस्ती मैदानाची कुस्ती निवेदनाची जबाबदारी श्री. धनाजी मदने व श्री. राजाभाऊ देवकते पार पाडणार आहेत.
अतिशय शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात वाढदिवस व कुस्ती मैदान होणार असून येणाऱ्या प्रत्येकाची उत्तम बैठक व्यवस्था व सावली केलेली असुन, होणारी गर्दी लक्षात घेऊन पार्किंगची सुध्दा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि इतर साधनांचा उपयोग करुन याविषयी सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे. नजरचुकीने कोणाला राहिले असेल तर हेच निमंत्रण समजून आपल्या लाडक्या कुस्तीसम्राट यांच्या वाढदिवसाला व त्यानिमित्त होणाऱ्या कुस्ती मैदानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही नम्र विनंती.
कळावे,
*आपलाच
श्री. आण्णासाहेब ढाणे
जिल्हापरिषद सदस्य, अध्यक्ष व वस्ताद नागन्नाथ तालीम संघ कुर्डू
*